*रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या वतीने इंदापूर येथे वृक्षारोपण.
इंदापूर: 78 व्यां भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने
रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या वतीने इंदापूर नगर पालिकेचा मागील बाजूस आठवडा बाजार प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
खेडो पाड्यातून आलेल्या गरीब कष्टकरी शेतकरी फळ भाजी विक्रेत्यांना एक मायेची सावली देण्याच्या रोटरी क्लब चे या पर्यावरण पूरक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला.
डिस्ट्रिक्ट 3131 चे पुणे जिल्हा एनवोर्मेन्ट डायरेक्टर रो. वसंतराव मालुंजकर यांचे मार्गदर्शन खाली हा उपक्रम राबविण्यात आला..
आळंदी येथील गाथा मंदिर भंडारा डोंगर भुलेश्वर येथील महादेवाचं मंदिर अशा विविध ठिकाणी रोटरी क्लब पुणे 3131 चे वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
यावेळी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर, डिस्ट्रिक्ट एनवोर्मेन्ट डायरेक्टर वसंतराव मालुंजकर , रोटरी क्लबचे अध्यक्ष मोरेश्वर कोकरे, फाउंडेशन डायरेक्टर नरेंद्र गांधी, कल्चरल डायरेक्टर धर्मचंद लोढा, स्पोर्ट डायरेक्टर प्रशांत शिताप, रोटरी क्लबचे सचिव राजाराम सागर, खजिनदार समीर सूर्यवंशी, रोटरीयन विष्णू पवार आणि रोटरी क्लब ऑफ इंदापूर चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.