शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शैक्षणिक बातमी
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही. पी. एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये व्याघ्र सप्ताह साजरा करण्यात आला.
शासनाने व्याघ्र सप्ताह साजरा करण्याचे घोषित केल्यानंतर प्रशालेतील कलाशिक्षक श्री. चंद्रकांत जोशी आणि श्री. संजय पालवे यांनी नियोजन करून प्रशालेमध्ये व्याघ्र सप्ताह साजरा केला.व्याघ्र सप्ताह निमित्त इयत्ता सहावी अ मधील विद्यार्थ्यांनी हाताने वाघाचे मुखवटे बनवून आणले. श्री चंद्रकांत जोशी यांनी विद्यार्थ्यांना वाघांबदल उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली.
समाजामधील काही लोक आपल्या हव्यासापोटी वाघांची शिकार करतात त्यामुळे अशा प्रकारच्या शिकारी करण्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. व्याघ्र सप्ताहाच्या निमित्ताने शालेय स्तरावर वाघाचे महत्त्व आणि निसर्ग चक्रासाठी वाघांची असणारी गरज ओळखून असे उपक्रम शालेय स्तरावर घेतले जातात.व्याघ्र सप्ताह साजरा करण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
अशा प्रकारच्या उपक्रमांची शालेय स्तरावर गरज असते आणि हे सर्व उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात येतात. व्ही.पी.एस मध्ये अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम नेहमीच राबवले जातात. उपक्रमाचे नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालीनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी कौतुक केले.