*महायुती व केंद्र सरकारने लोककल्याणाच्या योजना आणल्या. योजनांबद्दल काँग्रेस भ्रम पसरवित आहे - भाऊसाहेब देसले
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
राजकीय बातमी
पिंपळनेर : लक्ष विधानसभा महाविजय २०२४ अंतर्गत सुरू असलेल्या भाजपा मंडळ बैठकात प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व भाजपा सुपर वॉरियर्स यांची साक्री व पिंपळनेर मंडळ भाजपाची विस्तारित कार्यकारिणी बैठक दि. ५ ऑगस्ट रोजी लाडशाखीय वाणी मंगल कार्यालय पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे येथे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा अध्यक्षतेखाली झाली. बैठकीचे वक्ते म्हणुन भाजपा जिल्हा उपध्यक्ष भाऊसाहेब देसले हे होते. बैठकीचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
‘लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विशेषत: काँग्रेसने लोकांमध्ये असत्य पसरविले. लोकांची दिशाभूल केली. आता भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांच्या घरापर्यंत पोहचून सत्य पोहोचवावे. कोणताही पक्ष केवळ कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर मोठा होतो. भाजपही कार्यकर्त्यांची काळजी घेणारा पक्ष आहे. पक्षातील कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. पक्षाचे कार्य करताना कार्यकर्त्यांना कौटुंबीक आदी काही समस्या असतील तर त्या सोडविण्यासाठीही मदत करण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.’ एकापाठोपाठ महायुती सरकारने वेगवेगळ्या जनहिताच्या योजना आणल्या आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यास या योजना बंद करण्याची घोषणा केली आहे.
आपल्या चेलेचपाट्यांना योजनांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करायला लावल्या जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सत्ता मिळविण्याच्या नादात सामान्यांचे नुकसान करीत असल्याचे बबनराव चौधरी म्हणाले. बैठकीचे वक्ते म्हणुन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले यांनी उपस्थितांनाशी संवाद साधतांना सांगितले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येताच विरोधकांना सरकारच्या तिजोरीची चिंता वाटत आहे. जनतेचा पैसा जनतेलाच देण्याचे काम महायुती सरकार करीत आहे.
औरंगजेबाची बाजू घेणाऱ्या विरोधकांच्या पोटात दुखत आहे. सत्तेमध्ये येण्यासाठी काँग्रेस धडपड करीत आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी लोकांशी खोटे बोलण्याचे पाप केले. महायुतीच्या सरकारने, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लोककल्याणाच्या अनेक योजना आणल्या. या योजनांबद्दलही काँग्रेस भ्रम पसरवित आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भातील सत्य लोकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले. भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत आज मंडळस्तरावर संवाद सुरू आहे. लवकरच जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी हा संवाद आहे. पक्षाचे हित साधणाऱ्या सर्वच सूचनांचे स्वागत करण्यात येईल. या सूचनांच्या आधारावर जिल्ह्यातील भाजपला पुढील वाटचाल करण्यास नक्कीच मदत होईल, असेही भाऊसाहेब देसले यांनी नमूद केले, तळागाळातील कार्यकर्ता हाच भाजपचा आत्मा आहे. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातूनच भाजपने गल्लीपासून दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. लोकसभा निवडणुकीत जे झाले त्याने आम्ही हिंमत हरलेलो नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून साक्री विधानसभा मतदारसंघावर विजयी पताका फडकवावी, असे आवाहन किसान मोर्चा प्रदेश चिटणीस अॅड. संभाजीराव पगारे यांनी केले. साक्री विधानसभा निवडणुक प्रमुख मोहन सुर्यवंशी यांनी प्रास्ताविकेत आगामी विधानसभा निवडणुकीत साक्री विधानसभेची जागा महायुतीत भाजपाला सुटली पाहिजे व मला विश्वास आहे की, हि जागा भाजपाला सुटेल असे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले यांनी हि विचार व्यक्त केले. व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, किसान मोर्चा प्रदेश चिटणीस अॅड. संभाजीराव पगारे, भाजपा जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी, अरुण धोबी, शैलेंद्र आजगे, सौ. लिलाबाई सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, भाऊसाहेब देसले, विजय भोसले, भाजपा शिक्षण संस्था आघाडी प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव बच्छाव, साक्री विधानसभा निवडणुक प्रमुख मोहन सुर्यवंशी, साक्री भाजपा मंडळ अध्यक्ष संजय अहिरराव, पिंपळनेर भाजपा मंडळ अध्यक्ष विक्की कोकणी, जिल्हा चिटणीस प्रमोद गांगुर्डे, सौ. सुवर्णा आजगे, साक्री नगर पंचायत उपनगराध्यक्ष बापु गिते, पिंपळनेर शहराध्यक्ष डाॅ. राजेंद्र पगारे, सौ. कविता क्षिरसागर, जिल्हा सहकोषाध्यक्ष मोतीलाल पोतदार, योगेश भामरे, साक्री शहराध्यक्ष राकेश अहिरराव, पंकज भावसार, साक्री व पिंपळनेर मंडलातील विविध आघाड्या, मोर्चा व प्रकोष्ठ प्रदेश पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, निमंत्रित सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य, जिल्हा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील संचालक, मोर्चा व प्रकोष्ठ जिल्हा पदाधिकारी,शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष व बूथ कार्यकारिणी आदि उपस्थितीत होते. सुत्रसंचलन मनोज सोनवणे यांनी तर आभार विक्की कोकणी यांनी केले.