शहीद भगतसिंग म्हणजे अखंड ऊर्जा आणि प्रेरणास्रोत; मयूर बागुल.
धरणगाव -- येथील शहीद भगतसिंग चौकात (सत्यनारायण चौक) महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. 'इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज़्बातों से। अगर मैं इश्क़ लिखना भी चाहूँ तो इंक़लाब लिख जाता है।' -- शहीद भगतसिंग. महान देशभक्त, क्रांतीवीर, शहीदे आजम शहीद भगतसिंग यांचे कार्य आजच्या पिढीसाठी अखंड ऊर्जा व प्रेरणास्त्रोत असल्याचे प्रतिपादन मयूर बागुल केले. कार्यक्रम प्रसंगी शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुदर्शन भागवत यांच्यासह विकास मोरावकर, आनंद मानकर, खुशाल मांडगे, किरण सोनवणी, तेजेंद्र चौधरी, विकी मांडगे, अक्षय बारड, राज जगताप, सुनिल चित्ते, दर्शन भागवत इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शहीद भगतसिंग मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.