shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

तालुक्यातील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जाऊ लागू नये म्हणून विधानसभेत जाण्यासाठी आम्हाला एक वेळ संधी द्यावी - दिग्विजय बागल


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३०/ करमाळा तालुक्यातील रस्ते, आरोग्य, वीज, सिंचन, पोलिस व महसूल विभागातील प्रश्न यांसारखे प्रश्न लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे जसेच्या तसे असून त्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतआहे. जनतेचे  विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकदाही आमसभा न घेणारे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात पळपूटे आमदार असून आगामी विधानसभा निवडणूकीत अशा लोकांना आपली योग्य ती जागा दाखवावी असे आवाहन भाजपाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी हडपसर, काळेपडळ येथील शनिवार दि.२९ रोजी करमाळा तालुक्यातील या भागात वास्तव्य करणार्या बागल प्रेमी नागरीकांच्या मेळाव्या प्रसंगी केले. अधिक बोलताना बागल म्हणाले कि सद्याचे लोकप्रतिनिधीं सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. विकास सर्वांचाच झाला पाहिजे परंतु विद्यमान आमदारांकडून करमाळ्याच्या बाबतीत मात्र सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. स्व. दिगंबरराव बागल यांनी मंजूर करुन आणलेली दहीगाव उपसा सिंचन योजना तत्कालीन आमदार शामलताई बागल यांच्या कार्यकाळात  अंतिम स्वरुप घेत असताना काही नतद्रष्ट लोकांनी दहीगाव येथील नातेवाईकांना हताशी धरुन ९०० मीटर जलवाहीनीचे काम अडवून ठेवले. त्यामुळे दहीगाव उपसा सिंचन योजना रखडली. अन्यथा ही योजना मागील दहा ते बारा वर्षांपूर्वी सुरू होऊन बारा वर्षांपूर्वी पूर्व भागाचे नंदवण झाले असते. तसेच मामी साहेब आमदार असताना टेंभुर्णी जातेगाव मार्गाला मंजूरी मिळून प्रत्यक्ष काम सुरू झाले. परंतु २०१४ ला सत्ता बदल झाला आणि त्यानंतरच्या आमदारांनी स्वताचे व कार्यकर्त्यांचे टीपर पोकलेन कामावर घ्या, पैशांसाठी संबंधित कंपनीवर दबाव निर्माण केला. त्यामुळे संबंधित कंपनीने काम अर्धवट अवस्थेत सोडले. परिनामी दूरावस्थे मुळे तेव्हापासून आजपर्यंत या मार्गावर १९८ जनांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. फक्त आदिनाथ व मकाई कारखान्यांना अडचणी निर्माण करायच्या व त्याचा निवडणूकीत मुद्दा करुन निवडणूक जिंकायच्या. त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी व तालुक्यातील युवकांना रोजगारासाठी पुणे मुंबई अशा ठिकाणी भविष्यात स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये यासाठी दिगंबरराव बागलांचे नाव पुन्हा विधानसभेत पाठवणे गरजेचे असल्याचे दिग्विजय बागल यांनी बोलताना सांगितले.

यावेळी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, या भागांतील ज्येष्ठ, नगरसेवक मारुती आबा तुपे, शहराध्यक्ष प्रशांत भाऊ सुरसे, शेवाळवाडीचे सरपंच अशोक शिंदे, युवा उद्योजग सोमनाथ खराडे, रेणुकाताई मोहोळकर यांनी मनोगत व्यक्त करताना असे नमूद केले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्वच जण या वेळी सर्व काही ताकद देऊन रश्मी दिदी बागल यांच्या पाठीशी खंबीर साथ देत उभे राहून  सर्व बाबतीत मदत करणार असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक मारुती आबा तुपे, ज्येष्ठ नेते प्रशांत सुरसे, पुणे शहर काँगेस महिला आघाडीच्या उपाध्यक्षा पल्लवीताई सुरसे, हडपसर विधानसभा भाजप महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई लगड, पुणे शहर जिल्हा भाजप सरचिटणीस पुजाताई चोरमले, समाजिक कार्यकर्त्या राणी ताई फरांडे, शेवाळवाडीचे युवा सरपंच अशोकराव शिंदे, स्टार महाराष्ट्र न्युज संचालक अशोक घावटे, श्री. मकाईचे संचालक सतीश नीळ, युवराज रोकडे, आशिष गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवा ढेरे, गणेश झोळ, रांवगावचे सरपंच संदीप शेळके, अशोक नरसाळे, सरपंच मदन पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पवार, सूरज काळे, उपसरपंच विष्णू गर्जे, युवा नेते सुभाष फरांडे, अक्षय कुलकर्णी, डॉ. विजय रोकडे, ऊस पुरवठा अधिकारी मल्हारी मारकड, शशिकांत केकण, खादी ग्रामोद्योग मंडळ संचालक रमेश चांदणे, पै. दादा कांबळे, रवी भाऊ शेळके, युवराज जगताप, सचिन नवले व बागल प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रणजित शिंदे यांनी केले तर आभार सरपंच अशोक शिंदे यांनी मानले.
close