shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्‌घाटन


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३०/ करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने 27/09/2024 रोजी मराठी वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन कवयित्री चारू देवकर व प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून कवयित्री चारू देवकर ह्या लाभल्या होत्या. त्यांनी आपल्या व्याख्यानातून मराठी कवितेची निर्मिती तरुण वयामध्ये कशा पद्धतीने होते याची माहिती विद्यार्थ्यांना दिली व त्यांनी त्यांच्या काही कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कविता निर्मिती करता यावी याकरिता एखादी कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आणि काही कवींची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना काव्य लेखनासाठी प्रेरित केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. नितीन तळपाडे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. वंदना भाग्यवंत यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. प्रमोद शेटे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
close