प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुका शालेय तालुकास्तरिय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. नामिताताई मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले .या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री बेडस्कर साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून केज कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर,विधानसभा संयोजक शरद इंगळे,युवा नेते सुनील घोळवे,,सुरेश नांदे सर,पत्रकार रामदास तपसे, पञकार प्रकाश मुंडे संतोष जाधव, विकास जाधव, खद्दीर भाई कुरैशी हे उपस्थित होते.
या वेळी बोलताना आ नामिताताई मुंदडा म्हणाल्या की लवकरच तालुक्यातील मुलांना पिसेगाव येथे अद्यावत व सर्व सोयी असणारे क्रीडा संकुलचे काम लवकरच सुरू करणार आहोत त्यामध्ये स्वीमिंग टॅंक,रनिंग ट्रेकिंग, खो-खो,कब्बडी,टेनिस,फुटबॉल या सर्व खेळांचे अद्यावत ग्राउंड असतील व ते1 वर्षात पूर्ण होईल आसे आश्वासन आ. नमिता मुंदडा यांनी दिले .त्यांच्या हस्ते टॉस करून पाहिला सामना स्वामी विवेकानंद विद्यालय होळ विरुद्ध विश्ववनाथराव कऱ्हाड विद्यालय केज यांच्यात झाला या वेळी आ नामिताताई यांच्या वतीने मुलांना बिस्कीट व खाऊ वाटप करण्यात आला .क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील 23 संघांनी भाग घेतला होता. शालेय विद्यार्थी व क्रिकेट चाहते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.