प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २१/ गरजवंत मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी केले. मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरू केले आहे. त्या ठिकाणी शुक्रवार दि.२० सप्टेंबर रोजी प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला भेट दिली असता त्यांची तब्येत खालावली असून बोलायला, बसायला सुध्दा त्राण उरला नाही. मनं सुन्न झालं ! मराठा समाजाच्या लेकरांच भलं व्हावं म्हणून तडफडणारा जीव बघितला. मनोजदादा आपण काळजी घ्या; आपली समाजाला गरज आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि समाजाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती प्रा. रामदास झोळसर यांनी केली आहे. अंतरवाली सराटीला येथे भेटीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते गणेश मंगवडे, प्रशांत नाईकनवरे तसेच प्रा. संजय जगताप, सागर सरडे व नागेश चव्हाण, प्रशांत नाईकनवरे इं. उपस्थित होते.