प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज शहरात १० कोटी रुपायांच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे सभागृहाची पायाभरणी आणि तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ८) सकाळी ९.३० वाजता होणार आहे.
केज शहरात लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने होत असलेल्या सभागृहासाठी आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून सुरवातीला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. तर हे सभागृह अधिक अद्यावत होण्यासाठी आणखी ५ कोटी रुपये मंजुरीसाठी आ. मुंदडा यांनी पाठपुरावा केल्याने आणखी ५ कोटी रुपयांच्या निधीतून मंजुरी मिळाली आहे. आता १० कोटी रुपयांच्या निधीतून या सभागृहाची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या जुन्या डीवायएसपी कार्यालयाच्या जागेवर होत आहे. या सभागृहाच्या पायाभरणी आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी १० वाजता होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून असलेले केजकरांचे सांस्कृतिक सभागृहाचे स्वप्न साकार होत आहे.
त्याबरोबर केज शहरात क्रीडा संकुल उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबीत होती. आमदार नमिता मुंदडा यांनी पाठपुरावा करून क्रीडा संकुलासाठी ४ कोटी रुपयांचा निधीला मंजुरी घेतली आहे. या क्रीडा संकुलास पिसेगाव शिवारात जागा उपलब्ध झाली असून या ठिकाणी मंगळवारी सकाळी ९.३० वाजता आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते या तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन होत आहे. त्यामुळे खेळाडूंना सर्व सोयीसुविधायुक्त क्रीडा संकुल उभे राहणार असून हा महत्वाचा प्रश्न ही मार्गी लागला आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
-------------------------------------
*एमआयडीसी ला मंजुरी*
पिसेगाव येथे असलेल्या गायरानात औद्योगिक वसाहत म्हणजेच एमआयडीसी च्या उभारणीसाठी शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच कुंबेफळ येथील गायरान जमिनीत देखील औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव देखील मंजुरीसाठी दाखल झाला असून लवकरच त्याला देखील मंजुरी मिळणार आहे व त्याचेही उदघाटन लवकरच होणार आहे.