shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देऊ नका - - गणेश चिवटे

गणेश चिवटे यांचे डेपो मॅनेजरला निवेदन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ८/ करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये करमाळा एस.टी डेपोच्या काही बसेस थांबत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी गणेश चिवटे यांच्याकडे केली, याची त्वरित दखल घेत चिवटे यांनी डेपो मॅनेजर होणराव साहेब यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या सह्यांसह निवेदन दिले व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका अन्यथा होणाऱ्या नुकसानास आपण जबाबदार राहणार का असा सवाल उपस्थित केला. पुढे बोलताना चिवटे म्हणाले की करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्रवासाच्या व इतर कोणत्याही अडचणी आल्यास भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात संपर्क साधवा असे सांगितले व आपण कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असे ग्वाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली.

यावेळी वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, मांगीचे युवा नेते किरण बागल, नानासाहेब अनारसे, हर्षद गाडे व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रत्येक गावातील प्रवासी यांना आम्ही बसमध्ये घेणे बंधनकारक आहे परंतु काही कारणाने जर एसटी थांबत नसेल तर तशी विद्यार्थ्यांनी रीतसर तक्रार आमच्याकडे करावी आम्ही याच्यावर उपाययोजना करू. -
    डेपो मॅनेजर होणराव साहेब
close