*प्रवरानगर संकुलात कर्मवीर भाऊराव*
*पाटील जयंती सोहळा उत्साहात साजरी
अजीजभाई शेख / राहाता:
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब हे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून या विद्यालयाची माजी विद्यार्थ्यांची परंपरा मोठी आहे. गेल्या काही वर्षात या संकुलाची सर्वांगीण गुणवत्ता कौतुकास्पद आहे, असे मत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले.
प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात नुकतेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के तर अध्यक्ष म्हणून रावसाहेब म्हस्के हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे, अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य अंगद काकडे यांनी केले. यावेळी तनुजा भालेराव हिने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीमती सिंधू क्षेत्रे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार व प्राचार्य अंगद काकडे यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संजय ठाकरे, प्रफुल नव्हाळे, मंजुळा साबळे, जवाहरलाल पांडे, दीपक धोत्रे यांना आदर्श शिक्षक व मुमताज शेख यांना आदर्श शिक्षकेतर सेवक तसेच विद्यालयाचे थोर देणगीदार माणिकराव डावरे, शोभा चौधरी, डॉ. रोहित उंबरकर, राजेंद्रकुमार क्षिरसागर व डॉ. शरद दुधाट यांचा सन्मान करण्यात आला. तर सत्यम भालेराव, आशिया शेख व कुणाल बांगरे यांना अनुक्रमे ग्रामविकास अधिकारी, पोलीस दलात निवड व महाराष्ट्र बँक मॅनेजरपदी नियुक्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शिष्यवृत्तीसह विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथ घोगरे, माजी प्राचार्य भीमराव आंधळे, माजी प्राचार्य अण्णासाहेब साबळे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, रमेश शिंदे, रामदास कोरडे, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, उपप्राचार्य अलका आहेर, सुभाष भुसाळ, माजी प्राचार्य मधुकर अनाप, गोरक्षनाथ बनकर, नानासाहेब गांगड, बाळासाहेब निर्मळ, हरिभाऊ चौधरी, रतिलाल भंडारी, चंदूभाई तांबोळी यांच्यासह आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे डॉ. म्हस्के यांनी आपल्या भाषणातून विद्यालयाच्या गुणवत्तेचे कौतुक करून नवीन शैक्षणिक धोरण, नवीन तंत्रज्ञानाचा वापर व स्वीकार याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून रावसाहेब म्हस्के यांनी कर्मवीरांच्या त्याग व समर्पणाची आठवण करून देत डॉ. म्हस्के यांच्या कार्याचे कौतुक व निवडीबद्दल अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट, रेणुका वर्पे, अश्विनी सोहोनी व संगीता उगले यांनी केले तर आभार संजय ठाकरे यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
डॉ.शरद दुधाट,श्रीरामपूर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११