ग्रामपंचायत सदस्य दिलीप यादव कचरे
व ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीसमोर उपोषण
पाथर्डी / प्रतिनिधी:
तालुक्यातील मोजे पाडळी जि.अहमदनगर या गावातील इंदिरानगर वसाहतीमध्ये साधारण ३० वर्षापासून समाज मंदिर (चावडी) असून ती इमारत धोकादायक व मोडकळीस आलेली आहे तरी त्या इमारतीचे निरलेखन करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने वरिष्ठ जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयाकडे पाठविला आहे, मात्र इंदिरानगर वसाहतीतील नागरीकांची मागणी आहे की त्या इमारतीच्या गटावर नवीन इमारतीचे बांधकाम करून मागासवर्गीय व ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमाकरिता त्या इमारतीचा उपयोग होईल या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य दिलीप यादव कचरे गयांनी दि.३/९/२४ रोजी मा.जिल्हाधिकारी अहमदनगर,जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे लेखी एका निवेदन अर्जाव्दारे विनंती करण्यात आली होती.
परंतू तरी देखील या पत्राची दि.२०/०९/२४ रोजी पर्यंत कोणतीच दखल न घेतली गेल्याने सोमवार दि.३०/ ०९/२४ रोजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप यादव कचरे व ग्रामस्थ,पाडळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत, जोपर्यंत प्रशासन योग्य निर्णय देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा ग्रामपंचायत सदस्य दिलीप यादव कचरे, इंदिरानगर मधील माजी.ग्रा. पं.स.कारभारी कांबळे, अनिल कांबळे, दिपक कांबळे,विकास कांबळे, अरुण कांबळे,श्री संजय कांबळे व इतर उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार वजीर शेख -पाथर्डी
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११