प्रतिनिधी : संजय वायकर
चिचोंडी पाटील : चिचोंडी पाटील सेवा सह.सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच लिलाई मंगल कार्यालय येथे पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी सेवा सोसायटीचे ज्येष्ठ सभासद श्री. आप्पासाहेब पवार होते.प्रास्ताविक संचालक संदीप कोकाटे यांनी केले.
मागील वर्षी संस्थेचे एकूण कर्ज वाटप १५,४७,१०५०० इतके झाले तसेच संस्थेस एकूण नफा १४४९३६३ इतका झाला....अत्यंत पारदर्शी व काटकसरीने कारभार केल्याबद्दल तसेच कर्जदार सभासदांचा सोसायटीच्या इतिहासात प्रथमच अपघाती विमा काढल्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीने संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.अजूनही काही सभासदांना प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये अनुदान शासनाने जमा न केल्याबद्दल अनेक सभासदांनी खेद व्यक्त केला यावर संस्थेने योग्य तो पाठपुरावा करून सभासदांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले.
येणाऱ्या काळात संस्थेचे स्वतःच्या मालकीचे भव्य व्यापारी संकुल उभारणे, संस्थेचे आर्थिक स्तोत्र वाढवण्यासाठी सेतू कार्यालय संस्थेच्या वतीने चालविणे असे महत्त्वाचे निर्णय बहुमताने घेण्यात आले. सर्व सभासदांना १०% डिव्हीडंट वाटप देण्याचे चेअरमन श्री.महादेव खडके यांनी जाहीर केले
गेल्या आर्थिक वर्षात सर्व संचालक मंडळाने अतिशय पारदर्शक कारभार करून संस्थेचे हित जोपासले, सभासदांचा अपघाती विमा उतरविला आणि जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट परंपरा सुरू केली तसेच शासनाकडून कर्जमाफी होईल या आशामुळे अनेक सभासदांनी कर्ज न भरल्याने संस्थेची थकबाकी वाढली आणि पर्यायाने नफा कमी झाला त्यामुळे मार्च २०२५ अखेर सर्व सभासदांनी आपण थकबाकीदार राहणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांनी केले व काही तृटी सुधारण्याचे सुचविले .
सभेसाठी शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर,सरपंच शरद पवार,मा.पं.स.सदस्य सुधीर भद्रे,चेअरमन महादेव खडके,व्हा.चेअरमन अर्जुन वाडेकर, डॉ मारूती ससे,राजेश परकाळे,मा.सरपंच पांडुरंग कोकाटे,मच्छिंद्र खडके,कामधेनु चेअरमन डॉ.ययाती फिसके,अरुण दवणे,बाजीराव हजारे,दिलीप पवार,अशोक कोकाटे,राजेंद्र कोकाटे,पांडुरंग ससे,अंबादास फिसके,सुरेश ठोंबरे,पंडित कोकाटे,विठ्ठल कोकाटे,काशिनाथ वाडेकर,महेश जगताप,चंद्रकांत सदाफुले,कासमशेठ सय्यद, काशिनाथ बेल्हेकर,बबन कोकाटे भाऊसाहेब हजारे,तुकाराम कोकाटे,पंडित भद्रे,यांसह अनेक मान्यवर सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मारुती ससे यांनी केले.अहवाल वाचन सचिव श्री दत्तात्रय झांबरे यांनी केले तर आभार संस्थेचे व्हा.चेअरमन अर्जुन वाडेकर यांनी मानले.