shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोकरची सुकन्या डॉ.राजश्री कांबळे यांची प्रथम वर्ग वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंगलाताई कांबळे यांची सुकन्या डॉ. राजश्री भाऊसाहेब कांबळे यांची नुकतीच महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवेच्या गट -अ या संवर्गातील गट - अ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे नुकतेच महाराष्ट्र सरकार कडून घोषीत करण्यात आले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर या खेडेगावात जन्म झालेल्या डॉ.राजश्री भाऊसाहेब कांबळे यांचे प्राथमिक शिक्षण भोकर शिवारातील खानापूर रोडलगत असलेल्या हनुमाणवाडी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत झाले, माध्यमिक शिक्षण भोकर येथील जगदंबा प्रासादिक विद्यालय येथे, उच्च माध्यमिक शिक्षण श्रीरामपूर येथील रावबहादुर नारायणरारव बोरावके महाविद्यालयात झाले, उच्च शिक्षण संगमनेर येथील सिद्धकला आयुर्वेदीक महाविद्यालय येथे झाले व त्यानंतर त्यांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम डी ही पदवी प्राप्त केलेली आहे. 
शिर्डी येथील साई संस्थानचे माजी अध्यक्ष व माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांचे निकटवर्तीय असलेले धडाडीचे सामाजीक कार्यकर्ते स्व. भाऊसाहेब सिताराम कांबळे यांच्या व भोकर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंगलाताई भाऊसाहेब कांबळे यांच्या त्या कन्या आहेत, तसेच येथील सामाजीक कार्यकर्ते व आमदार लहु कानडे यांचे निकटवर्तीय असलेले काँग्रेसचे सामाजीक कार्यकर्ते गणेश कांबळे यांच्या त्या पुतणी आहे.

डॉ.राजश्री कांबळे यांना त्यांचे पती छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल जेलचे मेडीकल ऑफीसर डॉ. मंगेश घोडके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याच्या या नियुक्तीचे आमदार लहु कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचीन गुजर, माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे व मंदाताई कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले, अशोकचे माजी व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे आदिंनी अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच श्रीरामपूर तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close