एरंडोल :-दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त, शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून विशेष कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असल्याने प्रत्येक प्रात्यक्षिक वर्गात स्वतंत्रपणे संविधान उद्देशिकेचे वाचन प्रा. करण पावरा यांनी केले. विद्यार्थ्यांनीही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भारतीय संविधानाबद्दल आदर व्यक्त केला आणि संवैधानिक मूल्यांप्रती एकनिष्ठतेची शपथ घेतली.
कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आणि संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
हा उपक्रम विद्यार्थ्यांना संविधानाच्या मूलभूत तत्त्वांची जाणीव करून देणारा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पसरवणारा ठरला.