समाजातील सर्वात गरीब आणि असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी संविधान हे एक शक्तिशाली साधन आहे - आबीद खान
नगर / प्रतिनिधी:
मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने केडगांव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा याठिकाणी २६ नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व विधार्थांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली.
यावेळी मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी संविधान तयार करण्यासाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले परिश्रम आणि संविधानातील समानतेचा संदेश सुंदर व सोप्या शब्दात विद्यार्थ्यांसमोर मांडला.
आस्मा शेख यांनी विद्यार्थ्यां समोर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी शाळेच्या आयेशा सुलताना यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
समाजातील सर्वात गरीब आणि असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी संविधान हे एक शक्तिशाली साधन आहे.तो जितका मजबूत असेल तितका आपला देश मजबूत होईल असे आबीद दुलेखान यांनी सांगितले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111