श्रीरामपूर तहसिल कार्यालय
येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
ग्राहक मंच हा चर्चा व समन्वयातून ग्राहकांच्या अडचणी प्रश्न सोडवीत असते, जेथे फुकट म्हणून संबोधले जाते, तेथे आपली आर्थीक लुट ही होतच असते, आपण दक्ष रहा, अभ्यासू व्हा अन् आपली लुट थांबवा कारण या जगात काहीही फुकट मिळत नाही, अमिषाला बळी पडू नका, मोह जाळात फसु नका, जागरूक रहा, जागरूक व्हा हिच ग्राहकांची जागृती करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन केले जाते असे प्रतिपादन ग्राहक पंचायतीचे प्रा.डॉ.गोरख बाराहाते यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तहसिल कार्यालय येथे नुकताच राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा झाला यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दशरथ पिसे, ग्राहक मंचचे दत्तात्रय काशिद, किशोर कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, अनिता आहेर, पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी, अव्वल कारकून नितीन गरगडे, लीपीक योगेश खंडागळे, धान्य दुकानदार संघाचे जिल्हा सचीव रज्जाक पठाण, सहाय्यक निबंधक कार्यालयाचेे लिपीक आर.एस.जोशी, वजन मापे विभागाचे सुनिल चित्ते, एसटी महामंडळाचे शरद खोत, अशोक पतपेढीचे दिपक बडजाते व सुदर्शन पवार आदि उपस्थीत होते.
ग्राहक मंचासह शासनस्तरावरही ऑनलाईन पद्धतीची फसवणुक, ओटीपीद्वारे फसवणुक, वेगवेगळ्या लींकद्वारे होत असलेली फसवणुक हे सर्व साईबर क्राईम आहे. सध्याच्या काळात सायबर क्राईम ही सर्वांसाठी चिंताजनक विषय आहे. यासाठी प्रत्येकाने सजग व जागरूक होण्याची गरज आहे. महावितरण ग्राहकाला १५ दिवस अगोदर नोटीस दिल्याशिवाय वीज पुरवठा खंडीत करू शकत नाही, तसे घडल्यास ग्राहक मंचाशी संपर्क साधा. ग्राहकांच्या मागणीनुसार व ग्राहक मंचाच्या सुचनेनुसार लवकरच वैद्यकीय क्षेत्रात यापुढे प्रत्येक डॉक्टरांकडे दर पत्रक लावण्याच्या सुचना दिल्या आहेत, त्यानुसार लवकरच कारवाई होईल अशी ग्वाही यावेळी प्रा.डॉ.गोरख बाराहाते यांनी दिली.
अशोकनगर पतपेढी द्वारे चालविली जात असलेल्या गॅस एजन्सीकडून ग्राहकांना योग्य सुविधा दिल्या जात नाहीत, ग्राहकांनाच गॅस गोदामातून गॅस टाक्या उचलण्यास सांगीतल्या जातात. त्याच बरोबर गॅस टाक्या साठविण्याच्या गोदामातच कर्मचारी मोबाईलचा वापर करतात अशा तक्रारी करत असतानाच येथे गोदामातून टाकी घेतल्यास वाहतुक खर्चाचा परतावा ग्राहकांना दिला जातो परंतू इतर गॅस एजन्सीकडून ग्राहकांना वाहतुक खर्चाचा परतावा देण्याऐवजी त्यांच्या गोदामाबाहेर किंवा बाहेर थोडक्या अंतरावर वाहन उभे करून गॅस ग्राहकांकडून वाहतुक खर्चाची वसुली करून लुट सुरू असल्याचे यावेळी निदर्शनास आणुन दिले तसेच अनेक एजन्सीज ग्राहक दिनाला उपस्थित नसतात संबधीतांवर कारवाई करावी व ग्राहकदिन नुसता कागदावर न राहता ग्राहकांच्या सुचना व तक्रारींचे निराकारण करावे अशी मागणी मातंग अस्मीतेचे जिल्हाध्यक्ष भागचंद नवगिरे यांनी केली. त्यावर पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी यांनी दरवेळी प्रोसीडींग प्रमाणे कारवाई व पाठपुरावा केला जात असल्याचा खुलासा केला.
वनमापे नोंदणी करताना दरवर्षी दुरूस्तीच्या नावाखाली किमान एक हजार रूपयांची वसुली केली जाते, प्रत्यक्षात सध्या असलेल्या ईलेक्ट्रॉनिक काट्यांना कुठलीही दुरूस्ती नसते, संबधीत व्यावसायीक चालु असलेले वजन माप घेवून नोंदणी साठी जात असतात तरी ही दुरूस्तीच्या नावाखाली संबधीत व्यावसायीकांकडून वजनमापे निरीक्षकांच्या साक्षीने ही लुट केली जात असल्याचे चंद्रकांत झुरंगे व राजन वधवाणी यांनी निदर्शनास आणुन दिले, त्यावर संबधीतांनी या वजन काट्यात वर्षभरात बिघाड झाल्यास ती मोफत दुरूस्ती करून दिली जाते असा खुलासा केला, त्यावर अनेकांनी संबधीत लोक वर्षभर अशी दुरूस्ती करून देत नाही, किंवा सेवा दिली जात नाही, शिवाय सर्वांच वजन काट्यात बिघाड होत नसताना अशी आगाऊ रक्कम घेणे ही लुट असल्याची तक्रार केली.
तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सीएससी सेंटर चालकांकडे गॅस टाक्या उपलब्ध करून दिल्या जातात परंतू संबधीत केंद्र चालक ग्राहकांकडून जादा रक्कम घेवून लुट केली जात असल्याची तक्रार गोपीनाथ शिंदे यांनी केली. ग्रामीण भागात सीएससी सेंटर प्रमाणे स्वस्त धान्य दुकानदारांनाही गॅस टाक्या साठविण्याची व विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दशरथ पिसे यांनी केली.
यावेळी लालमोहमद जहागीरदार, चंद्रकांत झुरंगे, भिम शक्तीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास जाधव, किशोर आतकरे, सोपान मोरगे, प्रकाश गदीया, गोपीनाथ शिंदे, शिवाजी मोरगे, अशोक मोरगे, प्रेम छतवाणी, सुधीर गवारे, राजेंद्र वाघ, राजन वधवाणी, गोरक्षनाथ मोरगे, दत्तात्रय गागरे, वनराज ढाले, अमोल आसकर, शुभम होले, सिद्धी नाईक, ज्योती गजभिव, सुमन धनवटे आदिंसह ग्राहक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक रज्जाक पठाण यांनी केले तर शेवटी दशरथ पिसे यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार चंद्रकांत झुरंगे -भोकर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

