शिर्डीत लवकरच शिक्षकांचे
त्रेवार्षिक अधिवेशन होणार
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
पेन्शनर शिक्षकांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची त्यांच्या शिर्डीतील निवासस्थानी दि.१ डिसेंबर रोजी आपले प्रलंबित प्रश्न व मागण्यांबाबत भेट घेऊन निवेदन दिले.
त्यामध्ये प्रामुख्याने :अंश राशीकरणाची वसुली १५ वर्षा ऐवजी ११ वर्ष कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे प्रमाणे व कॅट च्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी होणे बाबत शासनाने आदेश काढावे तसेच ६५ वयास ५% पेन्शन वाढ करणे,केंद्राप्रमाणे दर महा १००० ₹ पेन्शन मध्ये आरोग्य भत्ता मिळणेबाबत आदेश काढावे,अशा मागण्या आहेत.
खासदार वाकचौरे हे केंद्रीय अर्थसमिती मध्ये सदस्य असल्याने ते अर्थमंत्र्याशी चर्चा करून निर्णय घेणेबाबत ब़ोलणार असल्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती उत्तर विभाग प्रमुख अशोक बागुल यांनी दिली.
सदर प्रसंगी द.मा.ठुबे, ब. द. उबाळे,रावसाहेब पवार श्रीरामपूर,मारुती चोथे राहुरी,अशोक बागुल श्रीरामपूर,आंद्रेस सोनवणे राहाता,भाऊसाहेब लावरे राहाता इ.उपस्थित होते.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची शिर्डी येथे पेन्शनर संघटनेने भेट घेतली त्यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे त्रैवार्षिक अधिवेशन घेण्यासंदर्भात सविस्तरपणे चर्चा करण्यात आली,यावेळी खा.वाकचौरे यांनी शिर्डी येथे अधिवेशन घेण्यास आपण सर्वतोपरी मदत करु असेही आश्वासित केले. यावेळी जिल्हाध्यक्ष द.मा. ठुबे गुरुजी,चिटणीस उबाळे उत्तर विभाग प्रमुख अशोक बागुल,राहुरी तालुकाध्यक्ष चोथे गुरुजी, माजी तालुकाध्यक्ष रा.या. पवार गुरुजी, राहाता तालुका अध्यक्ष लाहोरे गुरुजी इत्यादी पेन्शनर शिक्षक उपस्थित होते.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बा./जा.संपर्क क्र. 9561174111