श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तीन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. प्रसंगी महोत्सवाचा आरंभ कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पांडुरंग सांगळे, रोहन चव्हाण तसेच मिस इंटरनॅशनल इंडिया सौंदर्यवती रश्मी शिंदे यांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद व स्व.विधिज्ञ रावसाहेब शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मशाल पेटवून झाला.
दरम्यान सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पांडुरंग सांगळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच अभ्यास, शिस्त, वेळेचे नियोजन, रस्ता सुरक्षेचे नियम व मोबाईलचे फायदे-तोटे याविषयी माहिती दिली. तसेच सौंदर्यवती रश्मी शिंदे यांनी आपल्या भाषणातून वार्षिक क्रीडा महोत्सवास शुभेच्छा देऊन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. यावेळी इ.चौथी ते सहावीच्या विद्यार्थिनींनी 'लाईट द स्काय' या स्फूर्ती गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच इ.आठवी ते दहावीतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी उत्कृष्ट संचलन केले. हेड बॉय साईराज थोरात याने विद्यार्थ्यांसमवेत शाळेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. तसेच ब्ल्यू,रेड,येलो,ग्रीन हाऊसनिहाय विद्यार्थ्यांच्या इ.पहिली ते पाचवी व इ.सहावी ते दहावी या दोन गटात रनिंग रेस,रस्सीखेच, कबड्डी,क्रिकेट,खो-खो,हॉलीबॉल बास्केटबॉल या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक (एनआयएस कोच) अजय आव्हाड,मयूर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके,व्हा. चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे,खजिनदार डॉ.राजीव शिंदे,सौंदर्यवती रश्मी शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनीषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरव गोसावी, अनन्या शिंदे, सूत्रसंचालन राजवर्धन चौधरी, हिंदवी रोडे यांनी केले,तर शेवटी आभार अक्षदा दळे हिने मानले.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बा./जा.संपर्क क्र. 9561174111