1 डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 2 डिसेंबरला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,मोर्शी ,जिल्हा अमरावती येथे जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता संस्थेचे प्राचार्य श्री. कमलकिशोर फुटाणे सर तसेच उप जिल्हा रुग्णालय मोर्शी वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्री. प्रमोद पोतदार सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
एड्स बाबत प्रशिक्षणार्थ्यांना उद्बबोधन तसेच संस्था परिसरातून प्रशिक्षणार्थ्यांची ग्राम दुर्गवाडा परिसरात घोषवाक्य घेऊन रॅली काढण्यात आली रॅलीला विद्यार्थी व विद्यार्थींनी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. गटनिदेशक श्री सुरेन्द्र सावरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी श्री वडतकर सर श्री. मनोहर मुलढावे, श्री. निखिल पडतकर, श्री. जयप्रकाश भालेराव, श्रीमती . ममता ठाकूर, श्रीमती शुभांगी देशमुख, श्री. अकतेँ, श्री. राऊत, श्री. प्रफुल्ल सोनार तसेच उप जिल्हा रुग्णालय मोर्शी तर्फे श्री. विनय शेलूरे, श्री. श्रीकांत गोहाड आयसीटीसी समुपदेशक, श्रीमती. सुवर्णा श्रीराव प्र.शा.तं. यांचे योगदान लाभले.