shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मिळालेल्या कर्जातून महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे : मंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्यातील 121 बचत गटांना 5 कोटी रुपयांचे कर्ज वाटप

मिळालेल्या कर्जातून महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे : मंत्री दत्तात्रय भरणे 

इंदापूर तालुक्यातील 121 बचत गटांना 5 कोटी रुपयांचे कर्ज वाटप 
इंदापूर :  इंदापूर तालुक्यातील बचत गटांना खेळते भांडवल 15 हजारावरून, 30 हजार रुपये केले असून,  इंदापूर तालुक्यात 3110 महिला बचत गट आहेत. त्या माध्यमातून 31 हजार महिलांच्या हाताला आर्थिक बळ देण्याचे काम सुरु आहे. आज 121 महिला बचत गटांना 5 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झालेले असून, मिळालेल्या कर्जातून महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे. असे आवाहन राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. 

 इंदापूर पंचायत समितीच्या शंकरराव पाटील सभागृहात, इंदापूर तालुक्यातील 121 महिला बचत गटांना, उमेद योजनेअंतर्गत, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पाच कोटी रुपयांच्या धनादेश वाटप  करण्यात आले. यावेळी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,  राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, हनुमंत कोकाटे, माजी सरपंच विष्णू पाटील व सर्व बँकांचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. 

पुढे बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, आई, बहीण यांचे प्रेम वेगळे असते. कर्ज वाटपाच्या माध्यमातून त्यांना आधार मिळणार आहे. त्यांच्या मुलांना शिक्षण मिळणार आहे. कुटुंबाला मदत मिळणार आहे. त्यामुळे महिलांना विनंती आहे की, त्यांनी बचत गटातील अडचणीत असणाऱ्या महिलांना मदत करावी. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण होईल. आयुष्य संघर्षाचे आहे.  त्यामुळे आयुष्यात चांगली कामे करा. 

आता राज्यशासनाने महिलांना मुख्य प्रवाहात घेतले असून,  त्यामुळे राज्यात चांगला बदल होत आहे. महिलांना नाकारून किंवा डावलून चालणार नाही. अर्थसंकल्पात साठ हजार कोटींचे बजेट वाढले असून, रस्त्यासाठी एकही रुपया मिळालेला नाही. लाडक्या बहिणींना लाभ दिल्यामुळे, बजेटवर आर्थिक ताण आलेला आहे. तरीही इंदापूर शहरात महिलांना एक स्वतंत्र इमारत बांधून दिले जाणार आहे. अस्मिता भवनचे चांगले काम करून देणार आहे.  तसेच जिल्हा परिषद गटवाईज इमारती बांधून देणार आहोत. त्यामुळे महिलांना चांगली सोय होणार आहे. 
तसेच माझ्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे.  अशी कबुली मंत्री भरणे यांनी दिली.
close