संभाजीनगर :-
25 ते 30 वर्षांपासून राहत असलेले वडार समाजाचे गट नंबर 216 हरसुल येथील झोपडपट्टी महानगरपालिका अतिक्रमण विभाग नोटीसा दिल्यानंतर काढून घ्या असे आवाहन करत होते. यावेळेस समाजातील समाज बांधवांनी सोनाजी गायकवाड संपर्क केला असता वडार समाज संघ महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजी नगर मध्य शहराध्यक्ष या नात्याने सोनाजी गायकवाड व सहकारी शहर उपाध्यक्ष राजेंद्र सुर्वे, रवी शिंदे तसेच इतर समाज बांधव या ठिकाणी जाऊन पाहणी केली व संबंधित वार्डाधिकारी गिरी साहेब यांना भेटून सदर बाब त्यांना समजून सांगितले.
या ठिकाणी समाज बांधव गेली 25 वर्षापासून राहत असलेले त्यांना निदर्शनात आणून दिले. त्याचप्रमाणे मनपाने दिलेले शौचालय त्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे, त्यासंबंधीत पुरावे त्यांना दिले आहे व प्रदेशाध्यक्ष श्री जगन्नाथ फुलारे साहेब यांच्या आदेशानुसार निवेदन तयार करण्यात आल्यानंतर सोमवारी ३.०० वाजता मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी वडार समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.