श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पाककला या विषयाच्या अध्ययन-अध्यापना च्या दृष्टीने विद्यार्थ्यांना भारतीय खाद्य संस्कृतीची परिपूर्ण ओळख व्हावी,या हेतूने फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. फेस्टिवलमध्ये इ.पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. दरम्यान विद्यार्थ्यांनी वर्गनिहाय प्रत्येक राज्यातील खाद्य पदार्थ वर्ग शिक्षकांसोबत तयार करून विक्रीसाठी ठेवले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पदार्थ बनविणे व त्यांची विक्री करणे हे व्यवहार चातुर्य जाणून घेतले.पालक व विद्यार्थी यांनी स्वादिष्ट व रुचकर पदार्थ खरेदी करून त्यांचा मनमुराद आस्वाद घेतला.
शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या या खाद्य संस्कृती उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रसंगी विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते.
यावेळी फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थी व वर्गशिक्षक यांनी चना चाट, कप केक, इडली, मेदु वडा, चटणी, भाजी, चोको बॉम्ब,आप्पे, वडापाव, भेळ, सँडविच, चॉकलेट्, नूडल्स, चायनीज भेळ, दाबेली, मसाला पापड, कटलेट्स, पाणीपुरी, पावभाजी, मंचुरियन सूप, सोयाबीन चिली, मोमोज, रगडा, शेवपुरी, फ्राईड राईस, गुलाबजाम इ.खाद्यपदार्थ तर कोकम, लिंबू सरबत, लस्सी, मठ्ठा,रूह अफझा इ.शीतपेये व आईस्क्रीम विक्रीसाठी ठेवले होते.
यावेळी संगणकीय खेळ व गेम् झोन फेस्टिवलचे खास आकर्षण ठरले. फूड फेस्टिवल यशस्वीतेसाठी सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले.
यावेळी खाद्य संस्कृती या उपक्रमास विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके,व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, अमेरिकास्थित रोहित शिंदे, सौंदर्यवती रश्मी शिंदे,प्रा.डॉ. शंकरराव गागरे प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.
*वृत्त विशेष सहयोग
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111