श्रीरामपूर / प्रतिनिधी:
महाराष्ट्रात मराठी विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचे करण्याचा शासन परिपत्रक आदेश १३ सप्टेंबर २०२४ रोजी पारित झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून करावी, यासाठी अहिल्यानगर मराठी विषय महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शरद दुधाट आणि कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना नुकतेच निवेदन दिले आहे.
गत ऑक्टोबर महिन्यात केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला आहे. १३ सप्टेंबर २०२४ रोजी राज्य शासनाने मराठी विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचा केलेला आहे; परंतु मराठी भाषा ही सर्व विद्याशाखेत अनिवार्य करून शासन आदेशाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करावी, यासाठी राज्य महासंघाचे अध्यक्ष सुनील डिसले, कार्याध्यक्ष डॉ. मनीषा रिठे, सचिव बाळासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. शरद दुधाट यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि मराठी भाषा व उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना लेखी निवेदनाद्वारे विनंती केली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना यावेळी महासंघाचे कार्याध्यक्ष संपतराव गर्जे, समन्वयक डॉ. स्मिता भुसे, कार्याध्यक्ष डॉ. आशा पालवे, सचिव डॉ. अर्जुन चितळे, सल्लागार राजेंद्र जाधव कोषाध्यक्ष माधवराव रेवगडे, समन्वयक भावना वैकर, राहुरी तालुका अध्यक्ष रवींद्र घनवट, देवेश आहेर, दीपक धोत्रे आदी जण उपस्थित होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111