अजिजभाई शेख / राहाता:
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलाच्या प्राचार्य पदी नुकतीच विनायक मनोहर मेथवडे यांची नेमणूक झाली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार नुकत्याच झालेल्या मुलाखतीतून जनता विद्यालय कान्हुर पठार येथील फिजिक्स विषयाचे प्राध्यापक विनायक मनोहर मेथवडे यांची प्राचार्यपदी नेमणूक झाली आहे. प्राचार्य मेथवडे हे महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांचे वडील स्वर्गीय मनोहर मेथवडे सर या विद्यालयात टेक्निकल विभागाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. प्राचार्य मेथवडे यांनी नुकताच आपल्या प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारला असून संकुलाच्या वतीने संजय ठाकरे, उपप्राचार्य अलका आहेर, सुभाष भुसाळ यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिकापदी विद्यालयाच्या माजी शिक्षिका नलिनी जाधव यांची नेमणूक झाली आहे. या निवडीबद्दल प्राचार्य मेथवडे यांचा रावसाहेब म्हस्के, माजी विद्यार्थी दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सुभाष भुसाळ, डॉ. शरद दुधाट, देवेश आहेर, अनिल जाधव, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-वृत्त प्रसिद्धी सहयोग,
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111