शिवसेनेच्या ढोल बजाओ आंदोलनास यश; शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने संबंधित कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सत्कार
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
शहरातील नेवासा-संगमनेर रोडचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. या मार्गावरून रोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि व्यापारी प्रवास करतात. परंतु रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे वाहतुकीला अडथळा येत होता, अपघातांचे प्रमाण वाढले होते आणि स्थानिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. अखेर नागरी सुविधा विकास निधी अंतर्गत या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून हे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी प्रशासक किरण सावंत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप तसेच अभियंता गवळी यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करत त्यांचा सत्कार करण्यात आला.
नेवासा-संगमनेर रोड विकसित झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल यामुळे वाहतुकीला गती मिळेल, व्यापार-उदीम सुलभ होईल आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधता येईल. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला गती मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा रस्ता केवळ एका भौतिक सुविधेचा विकास नसून, संपूर्ण परिसराच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. भविष्यातही असेच विकासकामे वेगाने व्हावीत अशी जनतेची अपेक्षा आहे.
याप्रसंगी तालुकाप्रमुख लखन भगत, शहरप्रमुख संजय छल्लारे, तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर, ज्येष्ठ नेते अशोक (मामा) थोरे, भगवान उपाध्ये, संजय साळवे, तेजस बोरावके, युवासेना तालुकाप्रमुख सुरेश थोरे, युवासेना शहरप्रमुख सिद्धांत छल्लारे, श्री.कल्याणकर, बापू बुधेकर, शरद गवारे, संजय परदेशी, सुहास परदेशी, विशाल पापडीवाल, रोहित नाईक, प्रमोद गायकवाड, अकील पठाण, विशाल दुपाटी, दत्त करडे, अजय छल्लारे, सुनील फुलारे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111