अहिल्यानगर:-
दिनांक 10/03/2025 रोजी फडतरे नॉलेज सिटी मध्ये महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात एमबीए, पॉलिटेक्निक, फार्मसी, नर्सिंग आणि ज्युनिअर कॉलेजच्या सर्व महिला शिक्षक व सर्व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पहिल्या वर्ष बी फार्मसी च्या मुलींनी केली प्रमुख पाहुण्या म्हणून सोनाली
खाडे(psychologist and mind coach)यांना आमंत्रित करण्यात आले होते,
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली सरस्वती पूजन सोनाली खाडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुण्यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले. पाहुण्यांचा सत्कार मोनिका आखाडे चीफ अकाउंटंट यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळेस सर्व विभागातून 500 हून जास्त मुली होत्या
महिला दिनानिमित्त फनी गेम्स घेण्यात आले तसेच सर्व शिक्षका व काही विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले.