नगर / प्रतिनिधी:
येथील मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील छात्रशिक्षकांचा छात्रसेवाकालाचा समारोप मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कुलमध्ये पार पडला.
छात्रशिक्षकांनी दैनंदिन तासिकांप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण करुन विविध उपक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा, टाकाऊपासून टिकाऊ, खेळ-वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सय्यद फरहाना होत्या. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.प्रा. शेख अब्दुस सलाम, डॉ. शेख एजाज,शेख हसीब, सय्यद शबाना, शेख शबाना, सय्यद सबा आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सय्यद फरहाना यांनी छात्रशिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी छात्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111