सेनगांव/विश्वनाथ देशमुख
हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील साखरा येथे दि.२३ मार्च रविवार रोजी दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेच्या खातेधारकांसाठी एटीएम कार्ड वाटपासाठी आठवडी बाजारा निमित्ताने कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बँकेचे अधिकारी,कर्मचारी यांच्यासह खातेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि. २३ मार्च रविवार रोजी सकाळी ११ वाजता साखरा येथे दि परभणी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने हा कॅम्प घेण्यात आला होता.यावेळी बँकेच्या खातेधारंका कडून बँकेचे पासबुक,आधार कार्ड व पॅन कार्डची झेरॉक्स घेऊन त्यांना एटीएम कार्ड वितरित करण्यात आले.एटीएम कार्ड वाटप करण्यासाठी सेनगाव तालुका नियंत्रण अधिकारी संतोष जाधव,साखरा येथील पिडीसी शाखा अधिकारी एस.आर. पायधन,साखरा संस्थेचे सचिव अनिल कायंदे,चेअरमन पंढरीनाथ कायंदे,विरेद्र राउत,केलसूला येथील सरपंच भागवत भुतेकर,पत्रकार बालूअप्पा कोडे,शिवशंकर निरगुडे,संदीप राउत,श्रीरंग दराडे,रत्नदीप राऊत,शरद राऊत,सज्जन राऊत यांच्या सह अनेक खातेधारकांना एटीएम वाटप करण्यात आले.