श्रीरामपूर / प्रतिनिधी:
हिंद सेवा मंडळ अहमदनगर संचलित शा. ज.पाटणी विद्यालयाच्या चेअरमनपदी भरत बुधमल कुंकुलोळ यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे.
भरत कुंकुलोळ अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत आहेत. नगरपरिषदेचे नगरसेवक, भाग्योद्यय पतसंस्था संचालक, राजाराम तरुण मंडळ, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, बुद्धिबळ असोशियन आदी विविध ठिकाणी पदाधिकारी म्हणून ते कार्य करत आहेत.त्यांची निवड त्यांच्या कार्याची पावतीच आहे.
श्रीरामपूर शहर जडणघडणीत त्यांचे परिवाराचा मोठा वाटा आहे. त्याच्या या निवडी बद्दल हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, सोमय्या हायस्कूल चेअरमन संजय छलारे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111