आमचं तुमचं बोलत, वर्षे सरली किती
टॅक्स देती जन, तुम्ही मात्र करोडपती
सामान्य आम्ही जनं, तुम्ही नगरसेवक
आमदार-खासदार तुम्ही, जनतेचे सेवकं
कष्टाने भिजकी भाकरी आमची,
बिन मेहनतीची कमाई तुमची
पाच वर्षे राबून राबून,
आमचं कर्ज फिटत नायं
तुमच्या नशिबी ऐशाराम,
तुमचा पैसा घटत नाय
पाच वर्ष सरली, गरिबी नाही हटली
तुमची घरं नि दारं कोट्यानं नटली...
कोणती जादू अशी, नेतेपणात दडली
सांगा सांगा सरकार, आमची हौस मिटली
चंद्रकांत शहासने.
९८८१३७३५८५