*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे हेच खरे अभिवादन ठरेल -डॉ. जीवन सरवदे*
इंदापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या134व्या जयंतीनिमित्त इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी वरील मत व्यक्त केले.
डॉ. जीवन सरवदे म्हणाले की,' महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात आचरणात आणणे हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल. इंदापूर महाविद्यालयामध्ये उद्या दि. 15 एप्रिल रोजी 18 तास वाचन उपक्रम घेण्यात येणार आहे.'
यावेळी डॉ.शिवाजी वीर, डॉ.भिमाजी भोर ,प्रा.उत्तम माने, प्रा. सुनील सावंत, प्राध्यापिका सुवर्णा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तानाजी कसबे यांनी केले.