*भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन*
इंदापूर :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपालिका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. राहुल मखरे ,माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णाजी ताटे , माजी नगरसेवक शेखर पाटील , ॲड. इनायत काझी , मेघ:शाम ( नाना) पाटील, नगरसेवक जगदीश मोहिते ,गोरख शिंदे , अविनाश कोथमीरे , अनिल पवार ,हमीदभाई आत्तार ,दादा पिसे , ललेंन्द्र शिंदे , मच्छिंद्र शेटे , रघुनाथ राऊत तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.