shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

कौठळी शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
इंदापूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, समता, स्वातंत्र्य, बंधुता, व राष्ट्रीय एकात्मता यांचे खंदे समर्थक, शेती, ऊर्जा, व जलसंधारण या मुलभूत हक्कांचे प्रेरक, पुस्तकासाठी घर बांधणारे जगातील एकमेव ग्रंथ प्रेमी, स्त्री शिक्षण व स्त्री, स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, कामगार व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणारे लढवय्ये नेते, एक झुंजार पत्रकार, लेखक, संपादक, प्रभावी वक्ते, अद्वितीय संसदपटू, शिक्षणाचे अग्रदूत, विद्वत्तेचा महामेरू, विश्व रत्न, बोधी सत्व, महामानव, परम पूज्य, डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन  !  !

जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.भारत ननवरे यांनी मुलांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली.संविधान वाचन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड,अंगणवाडी मदतनीस त्रिशला पोळके, विद्यार्थी उपस्थित होते.
close