श्रीरामपूर / प्रतिनिधी:
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक माणसाला सामाजिक न्याय देणारे महामानव आहेत असे उद्गार अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल सदाफुले यांनी काढले. तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभाग, इतिहास विभाग व जयंती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, भारताची राज्यघटना ही देशातील सर्वोत्कृष्ट घटना आहे.
देशातील सर्व घटनांचा अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संविधान लिहिले.या संविधानामधील न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रत्येक माणसाला मिळाली पाहिजे आणि प्रत्येकाने कलमांनुसार आपले अधिकार व कर्तव्याला जागले पाहिजे असेही ते म्हणाले.इंग्रजी विभागाचे प्रा.गोरख साळवे यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांनी भुषविले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सतिश पावसे,प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111