shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गौराईमळा शाळेत उत्साहात साजरी*

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गौराईमळा शाळेत उत्साहात साजरी*
              इंदापूर:  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .प्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल नाझरकर व उपाध्यक्ष अमोल जाधव यांच्या हस्ते पुजन करण्यात आले . या वेळी भाऊराव जाधव , शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शामराव जाधव उपस्थितीत होते . 
           मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर व त्यांच्या प्रेरणादायी कर्तव्या बाबतीत माहिती देऊन आपण आपल्या कार्यातुन आपला ठसा निर्माण करावा हा आदर्श बाबासाहेबांच्या विचारातुन घ्यावा असे सांगितले . छोट्या मुलांनी पण आपले विचार व्यक्त केले.   
         या कार्यक्रमा वेळी मनिषा जाधव , शांताबाई जाधव , सारिका जाधव , पिंकु जाधव , सोनाली जाधव व अंगणवाडी मदतनीस कल्पना जाधव उपस्थित होत्या .शेवटी उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.
close