या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्रकुमार डांगे यांनी केले. प्राचार्य डॉ विजय केसकर आणि मान्यवर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य प्रा. गुळीग सर, डॉ. रामचंद्र पाखरे,डॉ.विलास बुवा, शारीरिक शिक्षण संचालक डॉ.सुहास भैरट, डॉ.प्रशांत शिंदे तसेच प्रा. राम कांबळे आई वडील आणि पुतणी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रमुख वक्ते म्हणून या कार्यक्रमासाठी मराठी विभागातील सहाय्यक प्रा. राम कांबळे उपस्थित होते. प्रा.राम कांबळे यांचा परिचय प्रा कपिल कांबळे यांनी करून दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम या विषयावर आपली मांडणी केली. यामध्ये त्यांनी अनेक देशांच्या राज्यघटनाचा संदर्भ देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम या विषयावर आपले मार्गदर्शन केले.
त्यादरम्यान त्यांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम, बिल गेट्स, लॉर्ड विन्सी,अशा अनेक तज्ज्ञांचा जागतिक विद्वानांचा संदर्भ देऊन श्रोत्यांना संबोधित केले.
शिक्षक हा स्वतः वाचक असला पाहिजे तरच तो वाचणारी पिढी घडवतो. मिलिंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) म.भि.चिटणीस, म.ना.वानखेडे, पु.शि.रेगे अशा विद्वान शिक्षकांचे संदर्भ दिले. दरम्यान त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम याविषयी बोलत असताना मराठी साहित्यातील काही लेखकांचेही संदर्भ दिले. त्यामध्ये हरि नारायण आपटे यांच्या "पण लक्षात कोणी घेतो" या कादंबरीचा संदर्भ दिला की नक्की त्या कादंबरीत काय आहे हे बाबासाहेबांना जाणून घेण्याची इच्छा होती. डेक्कन लायब्ररी व आताचे इंटरनॅशनल बुक डेपो या पुस्तकाच्या दुकानांमध्ये बाबासाहेब नेहमी येत असत त्यांचे आणि ग्रंथगारांचे चांगले ऋणानुबंध होते. जगातील एकमेव असा विद्वान आहे की, ज्याने मुंबईमध्ये पुस्तकांसाठी, ग्रंथांसाठी घर बांधले असे अनेक वेगवेगळे संदर्भ देऊन बाबासाहेब यांच्या जडणघडणीमध्ये त्यांचे वडील रामजी सपकाळ यांचा मोलाचा वाटा होता. असे उद्गार त्यांनी काढले आपल्या मुलाच्या पुस्तकांसाठी घरातील दागिने गहाण ठेवले असा पिता आजच्या पिढीत मिळावा असेही त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. विजय केसकर यांनी केला. त्यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्यांच्या ग्रंथाविषयी त्याचबरोबर दलित साहित्याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक पैलूंचा त्यांनी ऊहापोह केला. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. मंगेशकुमार निंबाळकर यांनी केले. त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या विधानाचा परामर्श घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुवर्णा बनसोडे मॅडम यांनी केले.त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या दिशेने पदयात्रा काढली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होते.पुतळ्याच्या शेजारी विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी मिळून भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी डॉ.रामचंद्र पाखरे सर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आवर्जून समाजबांधव ही उपस्थित होते त्यामध्ये लासुरने, खोरोची, निमसाखर व वालचंदनगर या परिसरातील समाज बांधव तसेच विद्यार्थी व प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.