इंदापूर प्रज्ञाशोध परीक्षा ही मुलांच्या स्पर्धा परीक्षेसाठी आदर्श निर्माण करणारी ठरणार
इंदापूर: मागील चार वर्षापासुन इंदापुर तालुका प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेमधील इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलांसाठी केले जाते . या परीक्षेमुळे मुलांना स्पर्धात्मक युगात मुलांना स्पर्धात्मक परीक्षेची सवय लागावी, परीक्षेची भिती कमी व्हावी आणि यश मिळेपर्यंत टिकुन राहण्याची क्षमता निर्माण व्हावी या उदात्त हेतूने या परीक्षेचे आयोजन केले जाते .दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी तालुक्यातील माध्यमिक शाळांवरती सदरची परीक्षा घेण्यात आली.त्या मध्ये श्री शिवाजी विद्यालय बावडा,
श्री. नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर ,कदम विद्यालय इंदापूर ,केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी,श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव , नंदिकेश्वर विद्यालय जंक्शन, छत्रपती हायस्कूल भवानीनगर,एल.जी. बनसोडे विद्यालय, पळसदेव व विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल भिगवण या ठिकाणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले . तालुक्यातुन इयत्ता ३ री व ४ थी च्या परीक्षेचे नियोजन माध्यमिक विद्यालयाच्या यंत्रणेमार्फत अतिशय पारदर्शक पद्धतीने करण्यात आले. तालुक्यातील ९ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी इयत्ता तिसरीच्या २ हजार ५२७ व चौथीच्या २ हजार ९९५ अशा एकूण ५ हजार ५२२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.अतिशय आनंदात व उत्साहवर्धक वातावरणात परीक्षा संपन्न झाली . या कामी पंचायत समितीचे कार्यक्षम व कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी सचिन खुडे व कार्यतत्पर ,कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात ,विस्तार अधिकारी सुनिल मुगळे , संजय रुईकर , केंद्रप्रमुख संभाजी आजबे ,श्याम बेंद्रे ,मनिषा दुर्गे मॅडम ,नानासाहेब दराडे , भरत गावडे व पंचायत समितीतील सर्व बी. आर. सी. टीम , केंद्र समन्वयक . माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ यांच्या सहकार्याने आज तालुका प्रज्ञाशोध परीक्षेचे यशस्वी आयोजन करता आले. या कामी विशेष सहकार्य
म्हणुन परीक्षा पार पाडण्यासाठी अतोनात कष्ट केलेले सतीश भोंग सर, पेपर तयार करणेसाठी .मैनुद्दीन मोमीन सर व श्रीमती इशरत मोमीन मॅडम या दोघांचे सुद्धा खूप सहकार्य झाले.
गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांच्या संकल्पनेतुन या स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे मुलांना नवोदय , शिष्यवृत्ती सारख्या स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करता येईल. मुलांचा स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कमपणे तयार होईल.
या परीक्षेसाठी मुलांची तयारी करुन घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे पंचायत समितीच्या वतीने मन:पुर्वक आभार मानण्यात आले .