श्री वर्धमान विद्यालयाचे 16 विद्यार्थी झाले शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र
इंदापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झाला. या अंतरीम निकालामध्ये श्री वर्धमान विद्यालयातील इयत्ता पाचवी चे 12 विद्यार्थी तर आठवीचे 4 विद्यार्थी पात्र झाले आहेत. इयत्ता आठवीची तन्वी मल्लिकार्जुन वच्चे हिने विद्यालयात सर्वात जास्त 296 पैकी 256 गुण प्राप्त केले.इयत्ता आठवीचे पात्र विद्यार्थी
ऋतुजा अतुल जाधवर 232,
अनुष्का सचिन काळेल 196, समर्थ गुरुसिद्धप्पा तोलनूरे 192 तसेच इयत्ता पाचवीचे पात्र विद्यार्थी- चैतन्य निलेश पानसरे 224, जोया उमरफारूख पठाण 222, शुभश्री सौरभ बागनवर 214, मुनीश सचिन सावंत 190, श्रेया नवनाथ बंडगर 184, अरुंधती अमोल नलवडे 176, समृद्धी संतोष पवार 174, संचिता दत्तात्रय भुजबळ 164, जोया समीर शेख 162, राजलक्ष्मी महेश कदम 154, श्रेयश धनाजी हाके 144, प्रतिष्ठा सागर झेंडे 124.
शालेय स्तरावरील भाषिक, तार्किक व बौद्धिक क्षमतेचा कस शोधणाऱ्या कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा म्हणजे इयत्ता पाचवी साठी उच्च प्राथमिक व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा होय. या शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्व लक्षात घेता शालेय प्रशासनाने शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा वर्ग म्हणजेच गुरुकुल वर्ग स्थापन केला. या गुरुकुल वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शालेय वेळे व्यतिरिक्त व शालेय अभ्यासक्रमासोबतच शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम नोव्हेंबर अखेर पूर्ण करून अंतिम परीक्षेपूर्वी 100 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेतला. याचेच फलित म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागला आहे.
इयत्ता पाचवीसाठी सुरज मोरे, अनिल गवारी, देवराम प्रधान व सूचीरता पडतूरे तर इयत्ता आठवीसाठी गोरख निकम, शुभांगी आगलावे, अश्विनी पांढरपट्टे, सारिका हिप्परकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन शाळा समितीचे अध्यक्ष मकरंद वाघ साहेब, शाळा समितीचे उपाध्यक्ष प्रशांत महामुनी साहेब, विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत कुंभार, उपमुख्याध्यापक अरुण निकम, पर्यवेक्षक शिवप्रसाद कुलकर्णी, पर्यवेक्षक अनिल उबाळे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.