शिष्यवृत्ती परीक्षेत एल.जी बनसुडे स्कूलचे नेत्रदीपक यश.
इंदापूर : पळसदेव (ता. इंदापूर )येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल जी बनसुडे स्कूल मधील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच लागला त्यामध्ये इयत्ता पाचवी मधील १० विद्यार्थी व इयत्ता आठवी मधील ८ विद्यार्थी असे एकूण १८ विद्यार्थी पात्र झाले आहेत अशी माहिती मुख्याध्यापक राहुल वायसे यांनी सांगितली.इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये २०० मार्क पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी अनुक्रमे यश रमेश जगताप (२५२) शिवानी रामदास वागजकर (२१८) रुद्राक्ष राजेंद्र गुणवरे (२१६) मार्क मिळवून तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये २०० मार्क पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी अनुक्रमे श्रेयश रमेश जगताप (२१४) स्वराली सचिन शेलार (२१२) आशुतोष संभाजी डोंगरे (२१२) मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून लाभलेले शिक्षक तेजस्विनी तनपुरे, प्रीती कुंभार , सुवर्णा वाघमोडे,जयश्री काळे, धनश्री मदने ,विद्या पोटे, राहुल वायसे यांनी मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत नाना बनसुडे ,उपाध्यक्ष शितल कुमार शहा , कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे ,सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे व सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.