shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोपाळ मोटे यांनी सामाजिक सलोखा बिघडवू नये : आमीन शेख

श्रीगोंदा प्रतिनिधी : नवीन वक्फ सुधारणा २०२५ च्या कायद्यानुसार वक्फ बोर्ड बाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आले असल्याने वक्फ नोंदणी रद्द करणेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. तर स्वतः आ. विक्रम पाचपुते यांनी ही वक्फ नोंदणी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव दिला असुन झालेली प्रक्रिया अधिकृत असुन तथाकथीत यात्रा कमेटीचे गोपाळ मोटे नागरिकांची दिशाभूल करुन जातीय तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप शेख महंमद बाबा यांचे वंशज ट्रस्ट चे अध्यक्ष आमीन शेख यांनी केला आहे.

सन १९९७ साली ट्रस्ट चे नाव बाबाचे वशज विश्वस्त, शेख मलंगबुवा हाफीजबुवा, हुसेन कमालबुवा शेख, नबीलाल बाबा शेख यांनी स्वतः धर्मादाय आयुक्त अ.नगर याच्या कडे शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट या नावा साठी स्किम दाखल केली. सदर स्कीम ला मा.धर्मादाय आयुक्त अ.नगर यानी १९९९ साली मान्यता दिल्याने शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट असे नाव झाले. मी ट्रस्ट चे नाव बदलले हा माझेवर होणारा आरोप साफ खोटे आहे.

सन २००८ साली शेख महंमद बाबा यांचा  इतिहास भावीकांच्या मागणीनुसार पुस्तक रुपाने प्रकाशीत केल्याने मोटे यांनी भावना भडकल्याच्या नावाखाली आम्हालाच मारहाण करुन आमच्या वर खोटे गुन्हे दाखल केले.व बाबांचे वंशज, पुजारी, विश्वस्तांची निवसस्थाने खाली केली त्या मुळे देवस्थान व देवस्थानच्या जमीनी सुरक्षित राहण्यासाठी बोर्ड कडे नोंदणी केली होती.

आमचे राहते घरातील सामान बाहेर रस्त्यावर फेकुन आम्हला बेघर करण्यात आले. त्या विरुद्ध आम्ही श्रीगोंदा न्यायालयात न्याय मागीतला मा.न्यायालयाने तथाकथीत यात्रा कमेटीचे गोपाळ मोटे वगैरेना शेख महंमद बाबा ट्रस्ट च्या स्थावर अगर जंगम मिळकती संबंधी त्यांच्या वापरास अगर हक्कास बाधा आणणारे कोणतेही कृत्य करु नये असा मनाई आदेश दि.११/२/२०१० रोजी दिला आहे. तो आदेश आज ही कायम आहे.

शेख महंमद बाबा यांनी हिंदू मुस्लीम ऐक्याचे व अखील मानव जातीचे कल्याणाचे, संमतेचे कार्य केले आहे.शेख महंमद बाबांचा उत्सव पुर्वी तीन दिवसाचा होता गोपाळ मोटे यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे की, बाबांचा इतिहास बदलण्याचा व देवस्थान ताब्यात घेण्याचा प्रयत्न कोण करीत आहे.

सन १९९६ साली गोपाळ मोटे वगैरे यांनी शेख महंमद बाबा ट्रस्ट बरखास्त करावा त्यांची वंशपरंपरा वहीवाट रद्द करावी व त्या ठिकाणी आमची विश्वस्त म्हणून नेमणूक करावी असा अर्ज धर्मादाय आयुक्त अ.नगर  यांच्या कडे केला होता तो अर्ज धर्मदाय आयुक्त अ.नगर यांनी फेटाळला तसचे श्री शेख महंमद महाराज देवस्थान उत्सव प्रतिष्ठाण यात्रा समिती नोंदणी अर्ज ६/२००३ सा.धर्मादाय आयुक्त यांनी फेटाळला

सन २०२२ साली गोपाळ मोटे व इतर २१ यांनी श्री संत शेख महंमद महाराज देवस्थान यात्रा उत्सव प्रतिष्ठाण ची नोंदणी केली या प्रतिष्ठाणचा आणि शेख महंमद बाबा देवस्थानचा कसलाही कायदेशीर सबंध नाही, मोटे यांचे सामाजीक प्रतिष्ठाण आहे कुंभार गुल्ली येथील मिळकत क्र.२०२ ही त्यांची जागा आहे जनतेची दिशाभूल करुन मोटे वारंवार शेख महंमद बाबा ट्रस्ट च्या कारभारात हरकत अडथळा निर्माण करत असल्याने शेख महंमद बाबा ट्रस्ट चे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्या बाबत ट्रस्ट च्या वतीने पुणे धर्मादाय आयुक्त यांच्या कडे अपील दाखल केले असुन त्यामध्ये पुणे धर्मादाय आयुक्त यांनी केलेल्या निर्णया विरुद्ध गोपाळ मोटे यांनी औरंगाबाद हार्यकोर्टात याचीका दाखल केली आहे.

नवीन वक्फ सुधारणा २०२५ च्या कायद्याअंतर्गत केलेली प्रक्रिया कायदेशीर आहे त्यात तांत्रीक बाब उपस्थित करुन जनतेचा गैरसमज करु नये. तुम्हाला सत्य मानने जड जातय आणि तुमचा जातीय आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा उद्देश आहे. जो शेख महंमद बाबांना कधीही मान्य होणार नाही. गावाशी खेळणाऱ्यांचा महंमद बाबा बंदोबस्त केल्या शिवाय राहणार नाही.

- टिळक भोस
close