वाद्य वाजवणाऱ्या ४० कलावंताबरोबर नगर मध्ये प्रथमच मोठी संगीत मेजवानी
नगर / प्रतिनिधी:
नगर मधील संगीतप्रेमीं रसिकश्रोत्यांसाठी सुमधुर गाण्यांची महफिल डॉ. दमन काशीद (पाटील), महेश घावटे व निलेश महाजन प्रस्तुत "९० गोल्डन इरा" मध्ये कुमार सानू, उदित नारायण, अलका याग्निक, सोनू निगम, अनुराधा पौडवाल यांच्या नवाजलेल्या रोमांटिक गीतांची मैफिलीचे रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता शहरातील स्टेशन रोड येथील सहकार सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याचे नगरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ.दमन काशीद यांनी सांगितले.
या कार्यक्रमात डॉ. दमण काशीद, डॉ. गायत्री कुलकर्णी, निलेश महाजन, महेश घावटे, प्रतिभा साबळे, पूजा गडकरी, सारिका रघुवंशी, सुशील देठे, सचिन चंदनशिवे आदि गीते सादर करणार असून दहा प्रोफेशनल गायक कोरस देणार आहे. सहा डांसर असून उत्तम सूत्रसंचालन असणार आहे. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी असल्याकारणाने श्रोत्यांसाठी चहा नाश्त्याची देखील मोफत व्यवस्था करण्यात आली असल्याचे डॉ. दमण काशीद यांनी सांगितले.
प्रथमच नगरमध्ये असा शो होत आहे ज्यामध्ये गीतांना संगीत देण्यासाठी ४० संगीत वाजविणारे कलावंत असणार आहे. ज्यामध्ये ऑक्टोपॅड, रिदम, तबला, साईड रिदम, पर्शियानिस्ट, कीबोर्ड, सेक्सोफोन, फ्लूट, सितार, गिटार, लीड गिटार, बेस गिटार, ब्रास सेक्शन, ट्रम्प पॅड, व्हायलंस साठी आठ कलाकार, गिटार कॉर्डिनेशन ग्रुप मध्ये आठ महिला कलाकार आदी वाजंत्रीचे या शोमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. हा शो सर्वांसाठी मोफत आहे. पण प्रवेशिका अनिवार्य आहे. त्यासाठी ज्ञानेश्वर माने यांच्या ८९५६३६३६६८ या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहनही डॉ. दमण काशीद यांनी केले आहे.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111