प्रा.वैजनाथ सुरनर. यांचे खूप मार्गदर्शक व्याख्यान संपन्न.
संजय माकणे-( प्रतिनिधी )
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते,कायदे तज्ञ,थोर विचारवंत, ज्यांनी कोणताही भेदभाव न करता देशातील सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र आणले आणि सर्वांना न्याय मिळवून दिला तसेच संविधानाच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजाला न्याय आणि हक्क मिळवून दिले , म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच खऱ्या अर्थाने भारताचे भाग्यविधाते होते असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह चाकुर येथे आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर १३४ व्या जयंती निमित्त कार्यक्रमात प्रतिपादन केले...
डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह चाकुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त "फुले,शाहु आंबेडकरांचे जीवन व कार्य " या विषयावर साहित्यिक तथा दलित मित्र प्रा.वैजनाथ सुरनर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते .
ते बोलताना पुढे म्हणाले,"फुले ,शाहु,आंबेडकर हे सर्व बहुजन समाजाचे उध्दारकर्ते होते. त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी मानवी कल्याणचे कार्ये केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गृहपाल श्रीमती वर्षा चौधरी,गृहपाल के .एम.फड होते, या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार गृहपाल के .एम.फड यांनी मानले तर सुत्रसंचलन नामपल्ले अजय यांनी केले यावेळी गृहपाल वर्षा चौधरी मॅडम यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून घेतला....
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वस्तीगृहाचे कर्मचारी महादेव बोईनवाड, कांबळे राजकुमार,कोरे लक्षमण , भालेराव भरत, ज्ञानेश्वर चिंते,जाधव रविकुमार, जोगदंड संकेत यांनी प्रयत्न केले.....