अजीजभाई शेख / राहाता
राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील एनएमएमएस आणि सारथी या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने उत्तुंग यश संपादन केले आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या नगर, नाशिक, नंदुरबार व बीड या जिल्ह्यातील या परीक्षांसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४१६ विद्यार्थी या दोन्ही परीक्षांसाठी पात्र ठरले आहेत. एनएमएमएस अर्थात राष्ट्रीय दुर्बल घटक कमी उत्पन्न गट असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी प्रोत्साहनपर राज्य व भारत सरकारद्वारा शिष्यवृत्ती दिली जाते.
उत्तर विभागातील या परीक्षेसाठी शिष्यवृत्ती पात्र झालेल्या एकूण ४०४ विद्यार्थ्यांनी १ कोटी ९३ लाख ९२ हजार इतकी शासकीय तर सारथी म्हणजे मराठा कुणबी ओ बी सी प्रवर्गातील उत्तर विभागातील एकूण १०१२ विद्यार्थ्यांनी ३ कोटी ८८ लाख ६० हजार ८०० रुपये इतकी शासकीय शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. सलग चार वर्षे या विभागाने या दोन्ही परीक्षेत उत्तर विभागाचे नाव उज्ज्वल केले आहे.
यावर्षी शिष्यवृत्तीधारकांची संख्या अधिक असून या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करण्यात आर्थिक उच्चांक गाठला आहे. निश्चितच ही जम्बो शिष्यवृत्ती मिळविण्याचा मान रयतच्या पाचही विभागांपैकी नगरच्या उत्तर विभागाला सतत चार वर्षांपासून मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, सहसचिव बंडू पवार,सहसचिव उच्च शिक्षण, शिवलिंग मेनकुदळे, राजेंद्र मोरे सहसचिव ऑडिट तसेच उत्तर विभागीय चेअरमन आ. आशुतोष काळे, व्हा चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, दादाभाऊ कळमकर, राहूल जगताप , सर्व जनरल बॉडी सदस्य, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, विभागीय गुणवत्ता कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर, विभागीय गुणवत्ता प्रमुख सुधीर साबळे व सदस्य, सर्व शाखाप्रमुख उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व शिष्यवृत्ती विभाग प्रमुख यांनी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. वृत्त विशेष सहयोग डॉ.शरद दुधाट - श्रीरामपूर, वृत्त प्रसिद्धी सहयोग समता मीडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर

