shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काचोळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवली साडे चौदा लाख रुपयांपेक्षा अधिक ची शिष्यवृत्ती

एन एम एम एस शिष्यवृत्तीधारक २० विद्यार्थी, सारथी शिष्यवृत्तीसाठी १३ विद्यार्थी पात्र, विद्यालय तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
रयत शिक्षण संस्थेचे डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. विद्यालयाचे एकूण २० विद्यार्थी एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी तर १३ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच विद्यालयाने एवढे मोठे यश संपादन केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विद्यालय या परीक्षेत तृतीय क्रमांकावर आहे. 
सदर परीक्षेमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकूण १४ लाख ५९ हजार २००  रुपयांची शिष्यवृत्ती पुढील शिक्षणासाठी मिळवली आहे.

       एन एम एम एस परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे :- अहिरे प्रशांत सुरेश, 
चौथे वेदिका शैलेश, धवन शार्दुल मंगेश, भोसले मानस संदीप, सुरूडे मानसी जीवन, पालवे शौर्य विशाल, भाकरे मोक्षदा प्रदीप, धनेधर अनुष्का संदीप, अभंग भक्ती अप्पासाहेब, सोनवणे कृतार्थ राहुल, शेख सरताज जावेद, शेरकर सृष्टी मनोज, काटे ओमकार विजय, साळुंके वैभवी सोमनाथ, बोर्डे संस्कार विजय, भोये चेतन सुरेश, करोडेवाल सिद्धांत योगेश, सोनवणे स्वरांजली सचिन, साळवे अनिकेत परशुराम, शिंदे श्रावणी किशोर.
       सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे :- मोरे पुष्कर धनंजय, गवारे श्रेया दिनेश, भांड स्पर्श सचिन, कोरडे प्रथमेश राजेंद्र, वाघ राधिका दत्तात्रय, साताळकर साई बाळू, काळे दर्पण सचिन, परतुडकर दर्शन बाबासाहेब, उगले भक्ती दत्तात्रय, आहेर यश संदीप, शेटे श्रीराज शरद, कोठुळे प्रणाली कैलास, गुलदगड वृषाली अजय. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख  सोपान नन्नावरे व नीलिमा गेडाम तसेच भाऊसाहेब लोंढे, विपुल गागरे, स्नेहा निंबाळकर, मनीषा घावटे, रीना जोशी, अनिता सातव, सुनील खाडे आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले .
     या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम पाटील, उत्तर विभागीय अध्यक्ष आ. आशुतोष काळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, उत्तर विभागीय गुणवत्ता कक्षाचे प्रमुख काकासाहेब वाळुंजकर, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे व बाबासाहेब नाईकवाडी, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल साळवे, पर्यवेक्षक सूर्यकांत सराटे, वसतिगृह अधीक्षक महेंद्र भराड, अध्यक्ष व सर्व सदस्य स्थानिक स्कूल कमिटी, पालक शिक्षक व माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे  अभिनंदन केले.
           विद्यालयाच्या या नेत्रदीपक यशाबद्दल पालक वर्ग व समाजातील सामाजिक संस्था यांच्याकडून कौतुक व समाधान व्यक्त केले जात आहे तसेच यशस्वी विद्यार्थी, पालक व विद्यालयाचे मुख्याध्यापक व स्टाफ यांचे अभिनंदन केले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close