shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री राम नवमी निमित्त ह भ प भास्कर महाराज भाईक यांचे किर्तनाचे आयोजन.


प्रतिनिधी मोहन शेगर सोनई
येथे प्रभू श्रीराम नवमी उत्सव समिती वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 नेवासा तालुक्यातील एक आगळा व भक्तीमय वातावरणात साजरा होणारा उत्सव अशी ख्याती आहे. 
      शनिवार दिनांक पाच रोजी रात्री साडेसात वाजता ह भ प भास्कर महाराज भाईक यांचे किर्तन हनुमान मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. किर्तन सांगता झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन केले आहे. 
         रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता शनी चौकातुन भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. प्रथम राम जप ,नंतर प्रभु श्रीरामाची आरती केली जाईल. सजवलेली राजस प्रभु श्रीरामांची भव्य मुर्ती  मिरवणुक आकर्षण ठरेल.मिरवणुक शनीचौक  , खंडोबा मंदिर, पुरंदरे गल्ली, मेन पेठ , श्री विठ्ठल मंदिर येथे येऊन मिरवणुक सांगता होईल.
   श्रीराम नवमी उत्सवात सर्व लहान थोर,माता भगिनींनी, बंधू श्रीरामभक्तानी  सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम नवमी उत्सव समिती घोडेगाव व समस्त ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले आहे.
close