श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील क.जे. सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (कला व वाणिज्य) मध्ये इ. ११ वी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्सहात साजरा करण्यात आला.
हिंद सेवा मंडळाचे. मानद सचिव श्री.संजय जोशी, हायस्कूलचे चेअरमन रणजीतजी श्रीगोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन जितेंद्रकुमार अग्रवाल व प्राचार्य भुषण गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय छल्लारे (मार्गदर्शक हिंद सेवा मंडळ, अहिल्यानगर.) हे होते. तर हिंद सेवा मंडळाचे सेवक प्रतिनिधी व पर्यवेक्षक कल्याण लकडे, प्रशासकीय अधिकारी कनिष्ठ महाविद्यालय भिका कांबळे तसेच शंभूक वसतिगृहाचे अधीक्षक अशोकराव दिवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे ८० विद्यार्थी उपस्थित होते, त्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन. जितेंद्रकुमार अग्रवाल यांनी अल्पहार दिला.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.योगेश शेटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शेरअली सय्यद यांनी केले. प्रा.अविनाश राऊत यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. प्रा.श्रीम कुमावत सुवर्णा यांनी अभार मानले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111

