हिंदू एकता आंदोलन पक्षाचा १७ रोजी राज्यव्यापी मेळावा..
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यव्यापी मेळावा गुरुवार, दि.१७ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन (आण्णा) शितोळे यांनी दिली.
या मेळाव्यात राज्याची नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार असून मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात आगामी होणार्या स्थानिक स्वाज्य संघटनांच्या निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करून कार्यकर्त्यांना सूचना करण्यात येणार आहे. तसेच नवीन कार्यकारिणी निवडण्यात आलेल्यानंतर निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, प्रदेशाध्यक्ष सुदर्शन (आण्णा) शितोळे, महाराष्ट्र राज्य संघटक संतोष जगताप, सांगलीचे प्रदेश सरचिटणीस दिपक ढवळे मार्गदर्शन करणार आहेत. गेली ३० वर्षे हिंदू एकता आंदोलन संघटना म्हणून राज्यात काम केले. त्यानंतर हिंदू एकता आंदोलन संघटनेचे रुपांतर हिंदू एकता आंदोलन पक्षाची स्थापन केली. हिंदू एकता आंदोलन पक्ष व हिंदू एकता आंदोलन संघटना एकच आहे. गेली ३० वर्षांपासून हिंदुत्व हिंदू एकता आंदोलन पक्षाकडेच असल्याचे राज्यात दिसत आहे. समान नागरी कायद्यासाठी पक्षाने अनेकवेळा आंदालने केली. हिंदू एकता आंदोलनमधील राज्यातील युवकांना पदे देवून राज्यात पक्षबांधणी करणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंगजी बावरी यांनी सांगितले.
व राज्यात येणार्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढविण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रात १२ जिल्हे व ४५ तालुक्यात पक्षाचे काम चालू आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष अमित सूर्यवंशी, वकील संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष ऍड. बाळासाहेब वाघमोडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ऍड.दत्तोपंत काश्मिरे, नाशिक हिंदू एकता युवा अध्यक्ष प्रसाद बावरी, दिंडोरी तालुकाध्यक्ष किशोर देशपांडे, धुळे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, जळगांव जिल्हाप्रमुख अनिल देवकर, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व शहरप्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीरामपूर शहराध्यक्ष बी.एम.पवार, जिल्हाध्यक्ष विजय जगताप, जिल्हा संघटक मनोहर बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष चिलिया तुवर, श्रीरामपूर तालुकाप्रमुख शिवाजी फोफसे, नेवासा तालुकाध्यक्ष अविनाश कनगरे, राहाता तालुकाध्यक्ष दत्तात्रय मंडलिक, जिल्हा संघटक सोपानराव पागीरे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बगाडे, राहाता शहराध्यक्ष रामदास सदाफळ आदि प्रयत्नशील आहेत.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111