shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हुंडा नको मामा! फक्त पोरगी द्या मला...

विवाह इच्छुक तरुणांकडुन थेट वधुपित्याकडे विनवणी

सेनगांव/विश्वनाथ देशमुख

शहरासह ग्रामिण भागात तरुणांच्या विवाहाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे कर्तबगार व सरकारी नोकरदारांचेच विवाह योग्य वयात होऊ लागले आहेत‌‌.उच्च शिक्षण घेऊन सुखी संसाराची स्वप्ने बाळगुन असलेले बेरोजगार तरुण पस्तीशी पार करु लागले तरी ही लग्नाच्या बाजारात त्यांना कोणीही विचारायला तयार नाही.काही ही असो वधु पित्याला अच्छे दिन आले आहेत तर विवाह इच्छुक तरुणावर 'हुंडा नको मामा! फक्त पोरगी द्या मला' असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.



सात आठ वर्षापासुन परीस्थिती बदलत चालली आहे रोजगार उपलब्ध होत नसल्याने बेरोजगार युवकांच्या फौजा वाढत आहेत.जमिनीचे तुकडे कमी कमी होत चालले,नोकरी नाही त्यामुळे विवाह योग्य वय होऊन ही घरी विवाहासाठी वधु पिता फिरकेना एवढेच नाही तर साधी विचारपुस देखील कोणी करत नाही.पस्तीशी पार होऊन ही विवाह होत नसल्याने तरुणाई व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहे विवाह वंचीत तरुणांची टोळकी सध्या सर्वत्र वावरतांना दिसत आहे.हाँटेल,पानटपरी,ढाबे,परमिट रुम आदी ठिकाणी तरुण मित्र मंडळीशी मनातील दुख: एकमेकात व्यक्त करु लागली आहेत.एवढा हुंडा व अमुक तोळे सोने घेतल्याशिवाय विवाह जमणार नाही अशी भुमिका घेणाऱ्या वर पित्याला आज फुकटात कोणी पोरगी देतो का? असे म्हणत मुलगी शोधण्याची वेळ आली आहे.तर आपल्या बापापुढे जात "हुंडा नको मामा! फक्त पोरगी द्या मला अशी विनवणी विवाह इच्छुक तरुणांकडुन थेट वधु पित्याकडे होतांना दिसत आहे.


मुलांच्या तुलनेत मुली शिक्षणात ठरताहेत अग्रेसर

सध्या मुलीच्या शिक्षणाबाबत पालकामध्ये जागरुकता आलेली आहे पंधरा वर्षापुर्वी मुलगी हि परक्या घरचे धन आणि चुल व मुल सांभाळण्यासाठी अशी मुलींच्या बाबतीत धारणा होती त्यामुळे तिच्या शिक्षणाकडे गांभिर्याने पाहीले जात नव्हते.परंतु आता काळ बदलला आणि मुलांच्या तुलनेत मुली शिक्षणात अग्रसेर राहु लागल्या विवाह योग्य वयात आल्यानंतर मुली आपल्या पेक्षा कमी शिकलेला नवरा नको गं बाई असे हक्काने आई‌ वडीलाला म्हणु लागल्या आहेत.एवढे परीवर्तन समाजात घडले आहे त्यामुळे शिक्षकाची पत्नी शिक्षिका,डाँक्टरची पत्नी डॉक्टर,प्राध्यापकाची पत्नी प्राध्यापीका असे चित्र आज अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे

close