निवड केलेल्या महिलांचे सेनगांव न.पं.मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनाव्दारे मागणी
सेनगांव/विश्वनाथ देशमुख
आशा स्वंयसेविकेची पाच पदे रिक्त असल्याने सेनगांव नगरपंचायतच्या वतीने रिक्त पदे भरण्यासाठी ठराव संमत करुन पाच महिलांची आशा स्वयंसेविका पदी निवड करण्यात आली परंतु अद्याप ही भरती करण्यात आली नसल्याने तात्काळ निवड झालेल्या महिलांची भरती करण्यात यावी अन्यथा न.पं.कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा निवड झालेल्या महिलांनी दि.१६ एप्रिल रोजी मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनाव्दारे दिला आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,आशा स्वंयसेविकेची पाच पदे रिक्त असल्याने नगरपंचायतच्या वतीने रिक्त पदे भरण्यासाठी दि.१७ मे २०२३ मध्ये सर्वसाधारण सभा घेऊन ठराव क्र.११२ विषय क्र.(३) प्रमाणे रिक्त पदावर सर्वानुमते आमची आशा स्वंयसेविका पदी निवड करण्यात आली व आम्हाला सात दिवसात कागदपत्रे सादर करा असे पत्र नगरपंचायत कार्यालयाकडून देण्यात आल्या प्रमाणे आम्ही मुदतीत कागदपत्रे सादर केलीत.पुर्ण कागदपत्रे सादर करुन सात महिने झाली तरी सुध्दा रिक्त पदे भरण्यासाठी योग्य कारवाई होत नसल्याने तात्काळ आवश्यक कारवाई करुन आशा स्वंयसेविकेची पाच रिक्त पदे भरण्यासाठी सभागृहाने ठराव संमत केल्याप्रमाणे तालुका आरोग्य विभागाकडे पाठपुराव्यासह योग्य कारवाई करुन आम्हाला न्याय देण्यात यावा.सदर प्रकरणात आपल्याकडुन न्याय न मिळाल्यास वरीष्ठाकडे गरज पडल्यास न्याय संस्थेसमोर न्याय मागणे अपरीहार्य होईल.विना विलंब तात्काळ रिक्त जागी आमची भरती न झाल्यास नगरपपंचायत कार्यालया समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदन नगराध्यक्षा मनिषाताई देशमुख यांचे पती माजी उपनगराध्यक्ष कैलासभाऊ देशमुख यांनी स्विकारले असुन निवेदनावर अनुसया मारुती हामरे,रुखिया परविन मोहसिन सय्यद,सारीका शुभम तिडके,विमलताई शामराव गाढवे व नंदा प्रकाश तनपुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.